आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन दिवसांपासून अचानक थंडी वाढली आहे. सध्या पारा ११ अंशांपर्यंत खाली उतरला आहे. या थंडीतच आता आगामी १२ व १३ तारखेला जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या अंदाजावरून कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर येथील कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
१२ व १३ डिसेंबरला पावसाची शक्यता असून या काळात १४ डिसेंबरपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. वातावरणातील या बदलामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळ पिकाची काढणी लवकर करून घ्यावी. परिपक्व अवस्थेतील पिकांची काढणी केलेली असल्यास माल सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून तडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावा. फळबाग व भाजीपाला पिकांना वाढीच्या अवस्थेनुसार आधार द्यावा. फुटलेल्या कापसाची त्वरित वेचणी करून घ्यावी तसेच वेचलेला कापूस सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा. ढगाळ आणि पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
१५ डिसेंबरनंतर पुन्हा थंडी
मागील दोन दिवसांपासून तापमान कमी झाले आहे मात्र ही थंडी १० डिसेंबरपासून कमी होणार आहे. कारण वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र १५ डिसेंबरनंतर पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. -डॉ. सचिन मुंढे,कृषी हवामान शास्त्रज्ञ, दुर्गापूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.