आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका‎:विदर्भात पुन्हा पावसाची‎ शक्यता; शेतकऱ्यांत चिंता‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंधरा दिवसांपुर्वी शहरासह जिल्ह्यात ‎ ‎ काही ठिाकणी वादळी वारा,‎ गारपिटीसह पावसाने हजेरी लावत ‎ ‎ नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव‎ टांगणीला लागला होता. गेल्या ‎ ‎ आठवड्यात मेळाघाटात वादळी‎ पावसाने पुन्हा उच्छाद मांडला होता. ‎ ‎ त्यापासून दिलासा मिळत नाही, तोच‎ पुन्हा निर्माण झालेल्या हवामानशास्त्रीय ‎ ‎ परिस्थितीमुळे अवकाळी पाऊस पुन्हा ‎ ‎ बरसण्याची शक्यता असल्याची‎ माहिती श्री शिवाजी कृषी‎ महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी ‎ ‎ दिली.‎ सध्या उन्हाचा कडाका वाढला‎ अाहे. अशातच आता हवामान‎ खात्याने विदर्भात ९ एप्रिलपर्यंत तुरळक‎ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह‎ हलक्या मध्यम पावसाची शक्यता‎ वर्तवली आहे. इराणवर पश्चिमी‎ विक्षोभ सक्रिय आहे, तसेच द्रोणिय‎ स्थिती आहे, तर आसामवर चक्राकार‎ वारे वाहत आहेत. झारखंड ते अंतर्गत‎ तामिळनाडूवर ट्रफ रेषा निर्माण झाली‎ असून पावसासाठी वातावरण निर्माण‎ झाले आहे.

या हवामानशास्त्रीय‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ परिस्थितीमुळे विदर्भात ९ एप्रिलपर्यंत‎ तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम‎ पावसाची शक्यता आहे. तुरळक‎ ठिकाणी विजांच्या गडगडाटासह‎ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला‎ आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,‎ अमरावती, बुलढाणा, यवतमाळ,‎ वाशीम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली‎ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या‎ मध्यम पावसाची शक्यता आहे.‎ त्यानंतर मात्र १० एप्रिलपासून हवामान‎ कोरडे राहील, अशी माहितीही प्रा. बंड‎ यांनी दिली.‎

शेतकऱ्यांनी कराव्यात‎ उपाययोजना‎ ज्या शेतकऱ्यांनी पेरू बागेत छाटणी‎ केलेली आहे. तेथे झाडावर नवीन‎ फुटवे येत असून सध्याच्या‎ वातावरणात मिलीबग तसेच अन्य‎ रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट‎ शक्यता आहे. त्यासाठी पेरू उत्पादक‎ शेतकऱ्यांनी योग्य ती उपाययोजना‎ करावी, तसेच ज्या शेतकऱ्यांची गहू‎ कापणी आणि मळणी व्हायची आहे,‎ त्यांनी ती तातडीने करावी.‎ - प्रा. अनिल बंड‎