आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची शक्यता:आजपासून तीन दिवस पावसाची शक्यता

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यामध्ये ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान बहुतेक सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान एक ते दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, अमरावती येथील हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हा पाऊस येणार आहे. हा परतीचा पाऊस नाही.

याचवेळी पावसाचे प्रमाण फार जास्त राहणार नाही, असेही तज्ज्ञांनी सांगितले. ७ ऑक्टोबरनंतर चार ते पाच दिवस वातावरण निरभ्र राहणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरनंतर पुन्हा परतीचा पाऊस येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...