आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी ‘चंद्रभागा आपल्या दारी’:अभियानादरम्यान जनजागृती, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गणेशोत्सवादरम्यान नदीपात्रात गणेश विसर्जनाची गर्दी होवू नये, तसेच होणारे जलप्रदूषण व मूर्तीची कुठलीही विटंबना न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे. या उद्देशाने मागील काही वर्षांपासून चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम नगर परिषदेच्या सहकार्याने जलवृक्ष चळवळ, गाडगेबाबा महिला मंडळ आदी सामाजिक संघटनेच्या वतीने राबविण्यात येत आहे.

यावर्षी सुद्धा हे अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संबंधी नियोजनाची बैठक नगर परिषदेच्या सभागृहात तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, ठाणेदार प्रमेश आत्राम, मुख्याधिकारी तथा प्रशासक पराग वानखडे, जलवृक्ष चळवळीचे संकल्पक विजय विल्हेकर, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक राहुल देशमुख, प्रवीण जमधाडे, जयश्री चव्हाण यांच्या उपस्थिती नुकतीच पार पडली.

अभियानादरम्यान जनजागृती

शहरातील गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे व्हावे, नागरिकांना त्यांच्या घरासमोरच गणेश विसर्जनाची व्यवस्था व्हावी तसेच प्लॅस्टिक व निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लागावी यासाठी या अभियानाचे बैठकीत नियोजन करण्यात आले. या अभियानासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, प्लॅस्टिक निर्मूलन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, कृषी मार्गदर्शक, ई-पीक पाहणी आदीबाबत चंद्रभागा आपल्या दारी या अभियानादरम्यान जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे या वेळी सागंण्यात आले.

कार्यकर्त्यांची उपस्थिती

बैठकील माणीक मानकर, डॉ. गजानन हेरोळे, गणेश लाजूरकर, विलास घोगरे, कपील देवके, जयश्री चव्हाण, अनिल कुडंलवाल, विजय मेंढे, मनोज तायडे, प्रा. गजानन हेरोडे, वर्षा अग्रवाल, प्रवीण कासारकर, मालिनी पाटील, नम्रता शहा, प्रा. संगीता पुंडे, प्रा. राहुल सावरकर, गजानन देशमुख, मृणाल इंगळे, निलेश पारडे, गोपाल तराळ, राजेश वासणकर, महेश बुंदे, ज्योती सोमवंशी, राजेंद पारडे, संजय कदम, सचिन मानकर, अमोल कंटाळे, सुरज गुल्हाने, सुनील साबळे, वृक्ष प्राधीकरण अधिकारी निगम गायगोले आदींसह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पथनाट्याद्वारे जनजागृती

गणेश चतुर्थीपासून सुरुवात झालेल्या गणेशोत्सवादरम्यान जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय व काही शाळांद्वारे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसमोर जावून पथनाट्याद्वारे पर्यावरण व सामाजिक जनजागृतीविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे, तसेच जलवृक्ष चळवळीचे विजय विल्हेकर व सहकारी चंद्रभागा आपल्या दारी उपक्रमाबद्दल जनजागृती करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...