आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलकुंभ, निर्माल्य रथ शहरभर फिरणार:गणेश विसर्जनासाठी चंद्रभागा आपल्या दारी; पर्यावरणपूरक दर्यापूर नगर परिषदेतर्फे अभियानाचे नियोजन

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गणेशोत्सवादरम्यान नदीपात्रात गणेश विसर्जनाची गर्दी होऊ नये, तसेच होणारे जलप्रदूषण व मूर्तीची कुठलीही विटंबना न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे, या उद्देशाने मागील काही वर्षांपासून चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम नगर परिषदेच्या सहकार्याने जल वृक्ष चळवळ, गाडगेबाबा महिला मंडळ आदी सामाजिक संघटनेच्या वतीने राबवण्यात येत आहे. या वर्षी सुद्धा हे अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संबंधी नियोजनाची बैठक नगर परिषदेच्या सभागृहात तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, ठाणेदार प्रमेश आत्राम, मुख्याधिकारी तथा प्रशासक पराग वानखडे, जलवृक्ष चळवळीचे संकल्पक विजय विल्हेकर, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक राहुल देशमुख, प्रवीण जमधाडे, जयश्री चव्हाण यांच्या उपस्थिती नुकतीच पार पडली.

शहरातील गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे व्हावे, नागरिकांना त्यांच्या घरासमोरच गणेश विसर्जनाची व्यवस्था व्हावी तसेच प्लास्टिक व निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लागावी यासाठी या अभियानाचे बैठकीत नियोजन करण्यात आले. या अभियानासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, प्लास्टिक निर्मूलन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, कृषी मार्गदर्शक, ई-पिक पाहणी आदींबाबत चंद्रभागा आपल्या दारी या अभियानादरम्यान जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी पालीका प्रशासनाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. बैठकीला माणिक मानकर, डॉ. गजानन हेरोळे, गणेश लाजूरकर, विलास घोगरे, कपिल देवके, जयश्री चव्हाण, अनिल कुडंलवाल, विजय मेंढे, मनोज तायडे, प्रा. गजानन हेरोडे, वर्षा अग्रवाल, प्रवीण कासारकर, मालिनी पाटील, नम्रता शहा, प्रा. संगीता पुंडे, प्रा. राहुल सावरकर, गजानन देशमुख, मृणाल इंगळे, नीलेश पारडे, गोपाल तराळ, राजेश वासणकर, महेश बुंदे, ज्योती सोमवंशी, राजेंद्र पारडे, संजय कदम, सचिन मानकर, अमोल कंटाळे, सूरज गुल्हाने, सुनील साबळे, वृक्ष प्राधिकरण अधिकारी निगम गायगोले आदींसह शहरातील संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पथनाट्याद्वारे जनजागृती
गणेश चतुर्थीपासून सुरूवात झालेल्या गणेशोत्सवादरम्यान जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय व काही शाळांद्वारे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसमोर जावून पथ नाट्याद्वारे पर्यावरणविषयक जनजागृतीविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...