आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह 198 सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यात 10 ग्रामपंचायतींवर प्रहार गटाचे सरपंच तर 11 ग्रामपंचायतीवर काँग्रेस गटाचे सरपंच विजयी झाले. दोन ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले. अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बेलोरा येथे आमदार बच्चू कडू तर तळवेल येथे माजी जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या गटाने बाजी मारली.
आखतवाडा येथील सरपंच पदाकरीता काँग्रेसचे श्रीकृष्ण सोळंके (335), बेलज येथे काँग्रेस समर्थित ग्राम विकास पॅनलच्या योगिता ठाकरे (562), बेलमंडळी येथे काँग्रेसच्या ममता नेहारे (516), कल्होडी येथे प्रहार गटाच्या स्वाती चौधरी (391), चिंचोली काळे येथे काँग्रेसच्या अरुणा काळे (562), धानोरा पूर्णात काँग्रेसच्या अर्चना निरगुडे (423), घाटलाडकीत काँग्रेसचे शिवानंद मदने (2309), गोविंदपूर येथे प्रहार गटाचे सचिन सोलव (408), हैदतपूर येथे काँग्रेसच्या सुवर्णा साखरे (493), बेलोरा येथे प्रहारचे भैया कडू (2253) विजयी झाले. भय्या कडू हे माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांचे थोरले बंधू होत.
बोदड येथे काँग्रेसच्या सुचिता चौधरी (437), मासोद येथे प्रहारचे संजय वाकोडे (626), निंभोरा येथे काँग्रेसचे किसन सोनवणे (247), रसूलापूर येथे प्रहारच्या कल्याणी खुरद (450), रतनपूर येथे भाजप समर्थित सुजित ढोबळे (297), बोरगाव मोहना येथे काँग्रेसचे राजेश ठाकरे (288), जैनपूर येथे प्रहारचे प्रशांत फुके (435), कोंडवर्धा येथे प्रहारच्या भाग्यश्री धोंडे (648), लाखनवाडीत भाजप समर्थित बहुजन विकास आघाडीचे गजानन अकोलकर (257), रेडवा येथे प्रहारच्या वीणा जाधव (410), टाकरखेडा पुर्णा येथे प्रहारचे राजू पवार ( 740), तळणी पूर्णा प्रहारचे अभिजित इंगळे (444), तळवेल येथे काँग्रेसच्या अलका बोंडे (1559) विजयी झाल्या. तहसीलदार धीरज स्थूल, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदुर, प्रमोद राऊत यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
इश्वरचिठ्ठीने दोन निकाल
सदस्य पदाकरिता 2 ग्रामपंचायतींमध्ये ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यात बोदड येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये मुरलीधर सोलव यांना 149 व श्याम वानखडे यांना 149 अशी सारखी मते मिळाली. यात मुरलीधर सोलव यांचा ईश्वर चिट्ठीने विजय झाला. यासोबतच गोविंदपुर येथे प्रभाग क्रमांक 1 साठी शोभा सोलव व अंजी वरघट या दोन्ही उमेदवारांना 133 मते मिळाली असून यामध्ये अंजी वरघट या ईश्वरचिट्ठीने विजयी झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.