आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे आयोजन‎:चांदूर रेल्वे येथील जि. प. शाळेत‎ विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण‎

चांदूर रेल्वे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा परिषद‎ माध्यमिक शाळा व कनिष्ठ‎ महाविद्यालयात मुलींसाठी‎ स्वसंरक्षणासाठी मार्गदर्शनपर कराटे‎ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन‎ केले होते. या वेळी मुलांना सुद्धा‎ प्रशिक्षण देण्यात आले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ मुख्याध्यापक गणेश चौहाण, तर‎ प्रमुख पाहुणे म्हणून अखिल‎ भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे‎ तालुकाध्यक्ष शहजाद खान, गुड्डू‎ शर्मा, अमोल गवळी, मुख्य‎ प्रशिक्षक संदीप देशमुख आदींची‎ उपस्थिती होती. संदीप देशमुख यांनी‎ आत्मसंरक्षणाचे धडे दिले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भेलाऊ,‎ तर आभार प्रदर्शन भावना‎ वाढोणकर यांनी केले. प्रशिक्षण‎ शिबिराला शिक्षक, प्राध्यापक,‎ कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...