आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:चांदूर रेल्वेत कराटे स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार; स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे

चांदूर रेल्वे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही खेळाडूला जीवनात यश प्राप्त करण्याकरिता खेळाचा नियमित सराव करणे आवश्यक आहे. निरंतर सरावानेच खेळाडूत कौशल्य निर्माण होवून स्पर्धेत जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण होते, असे प्रतिपादन चांदूर रेल्वे येथील रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंधक दीपिका बाजपेयी यांनी केले. त्या शोतोकॉन कराटे डो-ऑरग्रोनॉझेशन अमरावतीतर्फे आयोजित चांदूर रेल्वे येथील कराटे स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त खेळाडूंच्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होत्या.

खेळाडूंच्या या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपिका बाजपेयी, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका अर्चना भटकर (भडांगे), जितेंद्र कर्से, दीपक देशमुख, राहुल ईमले, अविनाश केदार, प्रशांत गावंडे, धनंजय चौधरी, प्रकाश ठाकरे, उमेंद्र ढगे, मनोज महाजन, समीर जानवाणी, संस्थेचे कोषाअध्यक्ष अशोक मोटघरे, सुरेश मेश्राम, डॉ. गणेश वऱ्हाडे, अशोक जयस्वाल, डॉ. सागर वाघ, अ‍ॅड. नीलिमा मिसाळ अ‍ॅड. जिया खान, प्रशिक्षक संदीप देशमुख प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी देशमुख यांनी केले.

या प्रसंगी सपना पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कराटे स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केलेले अभिराम पाठक, परी कर्से, प्रबुद्ध वानखेडे, ध्रुव राऊत, सम्यक इंगोले, आराध्या करनाके, प्रथम ठाकरे, गुंजन राऊत, अपूर्वा केदार, सिद्धार्थ वानखडे, कार्तिक देशमुख, रेवन क्षीरसागर या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वय व वजन गटात कराटेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करून यश संपादन केले. सर्व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रशिक्षक संदीप देशमुख, आयुष नेवारे, तिलक चव्हाण, आनंद गायकवाड, रेवन क्षीरसागर, कपिल धामणकर, विनोद देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेत प्राविण्यप्राप्त या खेळाडूंचा झाला गौरव
कराटे स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त केलेले अभिराम पाठक, परी कर्से, प्रबुद्ध वानखेडे, ध्रुव राऊत, सम्यक इंगोले, आराध्या करनाके, प्रथम ठाकरे, गुंजन राऊत, अपुर्वा केदार, सिद्धार्थ वानखडे, कार्तिक देशमुख, रेवन क्षीरसागर या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वय व वजन गटात कराटेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करून यश संपादन केले. सर्व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...