आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात झालेल्या भरीव कामगीरीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात सुरळीत वीज पुरवठ्यात महावितरणला यश आले असून ग्राहकांच्या सोयीनुसार महावितरणच्या सेवेत बदल होत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष विदर्भ ग्राहक संघटना डॉ.आनंद घोंगडे यांनी केले.अमरावतीनंतर मोर्शी परशूराम भवन येथे जिल्हा प्रशासन, महावितरण,महापारेषण आणि महानिर्मितीच्या वतीने बुधवार २७ रोजी आयोजित ‘उज्ज्वल भारत उज्ज्व भविष्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संजय गुलक्षे, डॉ. प्रदिप कुऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले ,गट विकास अधिकारी उज्ज्वला ढोले,मुख्य अभियंता जयंत विके,अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे,दिपक देवहाते, उप व्यवस्थापक (पीएफसी) दीपक जैन, कार्यकारी अभियंता राजेंद्र मळसणे उपस्थित होते.महावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरूप महावितरणच्या ग्राहकाभिमूख केलेल्या सेवा या कौतूकास्पद असल्याचे मत डॉ. घोंगडे यांनी यावेळी व्यक्त केले.
उज्जव भारत उज्ज्वल विकास कार्यक्रमादरम्यान वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या ७ चित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच नुक्कड नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा विकासाचा वेध घेण्यात आला. तसेच यावेळी मागील आठ वर्षात विविध योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खासदार डॉ.अनिल बोंडे यांचा व्हीडीओ संदेश : यावेळी व्हीडिओ संदेशाद्वारे बोलतांना खासदार डॉ.बोंडे म्हणाले की,उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घराला वीज आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला वीज मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नाचा हा उत्सव आहे.शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी हा शासनाचा मानस असून २०४७ पर्यंत शेतकऱ्याला दिवसाला वीज मिळेल याचा विचार करण्यात आल्याचे यावेळी ते बोलले. तसेच मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी सुरूवात केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून गव्हाणकुंड येथे १६ मेगावॉटचे आणि लेहगाव येथे १ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारण्यात आले आहे.यासोबतच शासनाच्या विविध योजनेतून मागील आठ वर्षात जिल्ह्यात पायाभूत विकासाची भरीव कामे करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.