आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या छत्रपती संभाजी महाराजांनी देदीप्यमान जाज्वल्य इतिहास घडवला, त्या संभाजी महाराजांची “साहित्यिक संभाजी महाराज’ ही ओळख आपल्या समोर आली नाही, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. शरद गोरे यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव व ‘श्री बुधभूषणम्’ या सर्वात मोठ्या हस्तलिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडला. या वेळी ‘साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर आयोजित व्याख्यानात गोरे बोलत होते.
‘भाषेची मक्तेदारी एका जमातीने आपल्या नावावर जमा करून घेतली होती. सांस्कृतिक दहशतवाद या लिखाणाच्या माध्यमातून विपर्यास करून त्याचा इतिहास लोकांसमोर मांडला. कथा, कादंबरी, नाटक आणि मालिकांमध्ये इतिहास नसतो. इतिहासाला समकालीन साधनांचे पुरावे लागतात. निष्कलंक, सूर्याप्रमाणे असणारे संभाजी महाराज यांचे चरित्र काही इतिहासकारांनी जाणीवपूर्वक कलंकित करण्याचा प्रयत्न केला असल्याची घणाघाती टीका सुप्रसिद्ध इतिहास संशोधक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. शरद गोरे यांनी केली. प्रकाशन सोहळ्याला पालकमंत्री बच्चू कडू, मराठा सेवा संघाचे अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आ. अॅड. किरण सरनाईक, आमदार सुलभा खोडके, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. प्रताप अडसड, इतिहासकार डॉ. अशोक राणा आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.