आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:ट्रकच्या धडकेत बालक ठार; वृद्ध गंभीर जखमी

शेंदुरजनाघाट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड ते धनोडी रोडवर रामदेव बाबा लाॅनजवळ मंगळवारी सकाळी एका ट्रकने वृद्धास जखमी केले असून, एका ४ वर्षीय बालकाचा बळी घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक जयकुमार केवलप्रसाद पांडे,रा. लालगंज, (उत्तर‌प्रदेश) याने त्याच्या ताब्यातील ट्रक (एम.एच. ४७ टी.सी. ११७/६०६) भरधाव व निष्काळजीपणे चालवून दादुराम नागवंशी (वय ६० वर्षे) व चार वर्षीय लहान मुलगा कार्तिक सुनील धुर्वे याला गंभीर जखमी केले. उपचार सुरु असताना कार्तिकचा मृत्यू झाला, असे जख्मीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपी चालक जयकुमार केवलप्रसाद पांडे विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...