आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चिंचोक्याच्या गणपतीला 83 वर्षांचा इतिहास

चांदूर बाजारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील करजगावच्या गजानन महाराज संस्थाने आपली गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवत ८३ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. या संस्थेकडे असलेली मूर्ती ८३ वर्षांपूर्वी चिंचोके व अन्य साहित्यापासून तयार करण्यात आली होती. गणपतीच्या या मूर्तींसोबतच हनुमान व गरूडाची मूर्तीही तयार करण्यात आली होती. या तीनही मूर्तींना ८३ वर्षांचा इतिहास आहे. गुरू-शिष्यांनी हस्त कौशल्याद्वारे निर्माण केलेल्या या तीनही मूर्ती, आजही आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत.

८३ वर्षा पूर्वी करंजगाव येथील रायजीबाई खेरडे शिरजगाव कसबा येथे आपल्या लहान बहिणीकडे पाहुण्या म्हणून आल्या होत्या. तेथील सटवाई पुऱ्यातील आगळीवेगळी व मनमोहक, गणपतीची मूर्ती पाहून त्या भारावून गेल्या होत्या. त्यांनी त्या वेळी तेथील मूर्तीकाराला तशीच दुसरी मूर्ती तयार करून देण्याची विनंती केली होती. त्या वेळचे मूर्तीकार गंगाराम चकाजी वांगे व त्यांचे करजगाव येथील शिष्य बळीराम गोपाल कविटकर या गुरू शिष्यांनी मोबदला न घेता श्री गणेशासह हनुमान व गरुड अशा तीन मूर्ती चिंचोक्यांपासून तयार करून त्या करजगावच्या श्री गजानन महाराज संस्थानला दान दिल्या.

तेव्हापासून आजतागायत करजगाव येथे गणेशोत्सवात याच गणपतीची स्थापना करण्याची परंपरा संस्थानने पाळली आहे. दरवर्षी नवीन करण्याचा ध्यास गणेश मंडळांनी घेतला अाहे. त्यामुळे त्यांच्या नावीन्याची उत्सुकता सर्वांनाच असते. वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांची परंपरा कायम ठेवण्यासाठी गणेश मंडळाच्या सदस्यांचाही वाटा असतो.

मूर्ती हस्तकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना
चिंचोके, कागदाचा लगदा, सिरस, ताग व माती वापरून १५ सप्टेंबर १९३९ रोजी वांगे-कविटकर या गुरू-शिष्यांनी या तीन मूर्ती घडवल्या. आजही त्या मूर्ती हस्तकलेच्या सर्वोत्कृष्ट नमूना समजल्या जातात. अशा मूर्ती करजगाव व शिरजगाव वगळता, कोठेही नसल्याचा दावा येथील ग्रामस्थांकडून केला जातो.

बातम्या आणखी आहेत...