आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील इतवारा बाजार मुख्य बाजारपेठ अन् चित्रा चौक ते नागपुरी गेट या मार्गावरील सुमारे ६६ कोटी रुपये बजेट असलेल्या उड्डाणपुलाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडल्यामुळे येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. चित्रा चौकापासून पठाण चौकाकडे जाण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुंनी असलेल्या १० फुटाच्या अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी, ‘राँग साईड’ने येणाऱ्या वाहनांचे लहान-मोठे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुलाचे काम वेगाने पूर्ण करणे अपेक्षित असताना ते कधी निधीची उणीव, कधी कोरोना, कधी मजुरांची उणीव तर कधी तांत्रिक अडचणींमुळे रखडले. तीनदा मुदतवाढ मिळाल्यानंतरही या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने शहरातील मुख्य इतवारा बाजारात वाहतुकीच्या कोंडीची समस्या आणखीनच वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणेच आता शहरवासी टाळत आहेत.
तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागला उड्डाण पूल तयार करण्यात असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे काहीसा वेळ झाला आहे. कारणे येथे गर्डर, काॅलम उभे करणे सोपे काम नाही. त्यासाठी मशीन्स व बांधकाम साहित्य आणणे सहज शक्य होत नाही. सध्या काम सुरू झाले आहे. -तुषार काळे, उप-अभियंता, पीडब्ल्यूडी, अमरावती.
मार्गावरील व्यवसायच कमी झाला उड्डाण पुलाचे काम मुंगीच्या पावलाने सुरू असल्यामुळे तसेच जाणे-येणे करण्यासाठी केवळ १० फुटाची जागा शिल्लक असल्याने ग्राहक दुकानांमध्ये येतच नाहीत. त्यामुळे या मार्गावर ज्यांची दुकाने आहेत, त्यांचा व्यवसायच मंदावला आहे. -सुरेश जैन, अध्यक्ष, महानगर चेंबर.
बाजारात जाण्यासाठीही कंटाळा येतो उड्डाणपुलाचे काम रखडल्याने येथील रस्त्यांवर सतत वाहतुकीची कोंडी होते. सकाळी व सायंकाळी येथे वाहन आत शिरले की, ते बाहेर कधी निघणार याची शाश्वती नसते. त्यामुळे शहरातील सर्वात मोठ्या इतवारा बाजारात जाण्यासाठीही कंटाळा येतो.-मकरंद गुजर, नागरिक, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.