आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:शहरातील पन्नालाल बगीचा परिसरात नागरिकांना 12 दिवसांपासून पाणी नाही

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबापेठ - गोरक्षण प्रभागातील नवाथे सेंटर अंतर्गत येणाऱ्या भुतेश्वर चौकाजवळील पन्नालाल बगीचा परिसरातील पहिल्या गल्लीत मागील १२ दिवसांपासून नळ आले नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे येथे दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्ती झाल्यानंतर नळाला पाणी येईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. परंतु, शहरभर नळाला पाणी आल्यानंतरही पन्नालाल बगीच्या येथील गोपाल यादव, संजय इंगोले, श्रीकांत सावळे, धनंजय बोंडे, गजानन काळबांडे, राजेश राऊत, राहुल गावंडे, निखिल लुंगे, वाट, शर्मा, सव्वालाखे, अग्रवाल, संतोष जाधव, गणेश मालोदे अशा २० ते २५ घरांमधील नळाला १२ दिवसांपासून पाणी नसल्यामुळे हे सर्वच त्रस्त आहे.

घरी नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण बघता त्यांनी अखेर माजी स्थायी समिती सभापती मिलिं बांबल यांच्याकडे तक्रार केली. बांबल यांनी तत्काळ शाखा अभियंता आजणे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितले की, पाउप लाइन चोकअप झाली आहे. दुरुस्ती करावी लागेल. मात्र, काम लवकर होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी मिळायला हवे, यासाठी बांबल यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. त्यांनी मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता आहेत. तेव्हा तातडीने दुरुस्ती करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...