आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोकराचा लाभ:नागरिकांना पोकराचा लाभ मिळवून द्यावा : अब्दुल सत्तार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अधिकाधिक नागरिकांना ‘पोकरा’चा लाभ मिळवून द्यावा. ‘मनरेगा’तून रोजगार निर्मिती करावी व दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

‘माझा एक दिवस माझ्या शेतकऱ्यासाठी’ उपक्रमात मंत्री सत्तार यांनी सादराबाडी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यांची, तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते. आ. राजकुमार पटेल, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, सरपंच लक्ष्मी पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, आ. राजकुमार पटेल, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी जी. डी. देशमुख यांच्यासोबत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सादराबाडी येथे ग्रा.पं. सभागृहासाठी २५ लाख रुपये निधी मिळवून देण्याची घोषणाही कृषिमंत्र्यांनी केली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आ. पटेल, आ. भिलावेकर, जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. मंत्र्यांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभाचे वितरण लाभार्थींना करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...