आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:18 कोटी 56 लाखांच्या फसवणूकप्रकरणी शहर पोलिस परेश कारियाला ताब्यात घेणार

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शहर व जिल्ह्यातील ७९ गुंतवणूकदारांना तब्बल १८ कोटी ५६ लाखांनी गंडवण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ‘अनुग्रह’ स्टॉक अॅन्ड ब्रोकर प्रा. लिचा संचालक परेश मुलजी कारीया याला शहर आर्थिक गुन्हे शाखा लवकरच ताब्यात घेणार आहे. परेश कारिया हा सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे.

शहर व जिल्ह्यातील ७९ गुंतवणूकदारांनी तेजीमंदी डॉटकॉमच्या माध्यमातून ‘अनुग्रह’सोबत संपर्क केला. त्यानंतर अनुग्रहने ७९ गुंतवणूकदारांचे शेअर्स व रक्कम परस्परच एडलवाईजमध्ये गुंतवले व त्या बदल्यात एडलवाईजकडून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले होते. या रकमेची अनुग्रहने वेळेत एडलवाईजला परतफेकड न केल्यामुळे एडलवाईजने त्या शेअर्सची विक्री केली. दरम्यान, अशाच प्रकरणात मुंबईत दीड वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.

त्या प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने त्याचवेळी परेश कारियाला अटक केली होती. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्यापासून ताे मुंबईच्या कारागृहात आहे. दरम्यान, २८ जुलैला अमरावतीत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता अमरावती आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईत जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कारीयाला ताब्यात घेणार आहे. याचवेळी पोलिसांनी ‘तेजीमंदी डॉटकॉम’चा संचालक अनिल गांधी याचाही शोध सुरू केला आहे मात्र तो पसार असल्याचे पोलिसांना समजले आहे.

एडलवाईजचे ४२६ कोटी रुपये गोठवले
मुंबई पोलिसांनी तपासादरम्यान एडलवाईज कंपनीची ४२६ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. दरम्यान, अमरावती पोलिससुद्धा तपासादरम्यान अशाप्रकारची कारवाई करु शकतात.

बातम्या आणखी आहेत...