आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकायमस्वरुपी स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ हे अभियान राबविण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचे हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे तेथील ग्रामपंचायतीद्वारे स्वयंमुल्यांकन केले जाणार आहे. त्यासाठी 15 डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे.
गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग यामधुनच शाश्वत स्वच्छतेची चळवळ गतिमान होत असल्याचा सीईओ पंडा यांचा अनुभव आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते
शासनाच्या ई-ग्रामस्वराज या पोर्टलवर स्वयंमुल्यांकन पध्दतीचा अवलंब करत 15 डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायतीला आपला प्रथम सहभाग नोंदवायचा असून त्याकरीता 500 गूण असणार आहेत. कुटुंब स्तर, सार्वजनिक स्तर आणि स्वच्छता सुविधा या तीन स्तरावर माहिती भरायची असून याकरीता वैयक्तिक शौचालय, कुटुंब स्तरावर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, गावाच्या परिसराची स्वच्छता तसेच गावस्तरावरील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, घंटागाडी, प्लास्टिक विलगीकरण सुविधा, जनजागृती संदेश, निगराणी समीती, गुड मॉर्निंग पथक, नियमित सभा या उपक्रमाचा समावेश आहे. शुभारंभ कार्यक्रमादरम्यान स्वच्छ सर्वेक्षण 2023 बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मीशन कक्षातील अधीक्षक सुनील इंगोले, प्रदीप बद्रे, निलेश नागपुरकर, धनंजय तिरमारे, बाळु बोर्डे, निलीमा इंगळे, दिनेश गाडगे, संजय राजुरकर आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.