आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिपिकाचा महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ:पत्नीला व्हिडिओ दाखवण्याची धमकी, 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना बेड्या

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका 55 वर्षीय लिपिकाचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ पार्टेशनच्या प्लायवूडला छिद्र पाडून मोबाईलवर शुट केला. हा व्हिडिओ पत्नीला दाखवण्याची धमकी देत लिपिकाला दोघांनी 10 लाखांची खंडणी मागीतल्याचा गंभीर प्रकार अमरावतीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या दोघांना रंगेहात अटक केली. ही कारवाई आज करण्यात आली. मोबाईल शुटींगचा प्रकार राजापेठ भागात गुरूवारी (ता. 9) रात्री घडला.

हे आहेत संशयित

विजय शेषराव टिकस (31, रा. वरुड) आणि प्रितम रामराम धुर्वे (38, रा. बहादा, वरुड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. शहरातील 55 वर्षीय लिपिक वरुड येथे नोकरी करतो. त्यांच्यासह एक महिलाही याच गावात दररोज अपडाऊन करतात. त्यातून दोघांची महिलेसोबत ओळख झाली. यानंतर ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले.

लिपिकाने घेतली होती भाड्याने खोली

लिपीकाने वरुडातच एक खोली भाड्याने केली होती. या खोलीवर लिपीक व त्याची ही प्रेयसी अधूनमधून जात होते. दरम्यान लिपीकाच्या खोलीशेजारी काही तरुण भाड्याने खोली करुन राहत होते. लिपीक व तरुणांच्या खोलीत पार्टीशनसाठी प्लायवुड लावले होते. याच प्लायवुडला छीद्र पाडून ते तरुण लिपीकाच्या खोलीत पाहत होते.

दोघांचे केले व्हिडिऔ शुटींग

तरुणांचा विजय टिकस हा मित्र असल्याने तो एक दिवस खोलीवर गेला. त्याचवेळी लिपीक व त्याची प्रेयसी खोलीत हाेते. त्यावेळीचे आक्षेपार्ह चित्रीकरण प्लायवुडवरील छिद्रातून मोबाईलमध्ये केले. दरम्यान 30 मे रोजी लिपीकाचा एक निनावी कॉल गेला व त्याने लिपीकाला सांगितले कि, तुझे एका मुलीसोबतचे फोटो व व्हीडीओ आमच्याकडे आहे. ते आम्ही व्हायरल करु, जर असे करायचे नसेल तर मोर्शीत येवून आम्हाला पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. मात्र लिपीकाने त्या कॉलकडे लक्ष दिले नाही.

आक्षेपार्ह फोटो पाठवताच लिपिक हादलला

लिपीकाला संशयितांनी दोन आक्षेपार्ह फोटो पाठवले. त्यानंतर मात्र लिपीकाने स्वत:चा मोबाईल क्रमांकच बदलवून टाकला. लिपीकाला वाटले प्रकरण आता शांत झाले मात्र ९ जूनला सांयकाळी पुन्हा फोन आला व धमकी दिली कि, आमच्याजवळ तुझे असलेले चित्रीकरण व फोटो तुमच्या कुटूंबियांना दाखवतो. तुमचा संसार उध्वस्त करतो. जर असे होऊ नये, असे वाटत असेल तर दहा लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. ही रक्कम घेवून राजापेठ परिसरातील रघुवंशी हॉस्पीटलजवळ तत्काळ येण्याचेही सांगण्यात आले.

लिपिकाने केली पोलिसांत तक्रार

लिपीकाने आधी पोलिसांत तक्रार केली त्यानंर पोलिसांनी संशयितांनी बोलावलेल्या जागी सापळा रचला. पोलिसांच्या सांगण्यानूसार, रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रघुवंशी हॉस्पीटलजवळ लिपिक पोहचला. दोन संशयित लिपीकाजवळ येताच पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणाचा तपास पोलिस जमादार सागर सरदार हे करत आहेत. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता 12 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...