आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:आज, उद्या ढगाळ वातावरण,‎ नंतर वाढणार ‎हवेत गारवा‎

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी (दि. ४) आणि गुरुवारी‎ जिल्ह्यातील वातावरण ढगाळ राहणार आहे. त्यानंतर‎ मात्र आकाश स्वच्छ राहणार असून गारव्यात वाढ‎ होणार आहे, अशी माहिती कृषी हवामान तज्ज्ञ डॉ.‎ सचिन मुंढे यांनी दिली आहे.‎ आजपासून (दि. ३) वातावरणात काहीसा बदल‎ झाला आहे. आजही दिवसभर ढगाळ वातावरण‎ होते, तसेच गारवासुद्धा वाढला आहे.

आगामी दोन‎ दिवस वातावरण अशाचप्रकारे राहणार असून, ६‎ जानेवारीपासून आकाश निरभ्र राहणार आहे.‎ वातावरण कोरडे राहणार असल्यामुळे गारठा‎ वाढणार आहे. मध्यप्रदेशाकडून वाहत येणाऱ्या थंड‎ वाऱ्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांनतर थंडी वाढणार‎ असल्याचा अंदाज आहे. थंडीचा जोर अधिक‎ राहिल्यास पिकांना सिंचन करताना शक्यतोवर‎ रात्रीच्या वेळी सिंचन करावे, असेही कृषी हवामान‎ तज्ज्ञांनी सांगितले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...