आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान बुथ:जिल्हाधिकाऱ्यांची काटा मतदान बुथला भेट

वाशीमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी वाशीम तालुक्यातील काटा या गावी भेट देऊन मतदार ओळखपत्रांचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळेतील मतदान बुथला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, तहसीलदार विजय साळवे व महाआयटीचे जिल्हा समन्वयक सौरभ जैन यांची उपस्थिती होती.

काटा येथील मतदान बुथवर उपस्थित असलेले मतदार केंद्रस्तरीय अधिकारी सुनीता वाघ, गजानन गायकवाड आणि किशोर धामणे यांचेकडून १ ऑगस्टपासून आतापर्यंत किती मतदार ओळखपत्रांचे आधार क्रमाकांशी जोडणी करण्यात आली याबाबतची माहिती श्री. षण्मुगराजन यांनी जाणून घेतली. १० सप्टेंबरपर्यंत गावातील सर्व मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

आधार लिंकींगचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी कमी प्रमाणात केल्याबद्दल नाराजी व्यक्त करुन जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थीतीत येत्या १० सप्टेंबरपर्यंत गावातील सर्वच मतदारांचे मतदार ओळख पत्रासोबत त्यांचा आधार क्रमांक जोडण्याचे निर्देश संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना यावेळी श्री. षण्मुगराजन यांनी दिले. उपस्थित गावकऱ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून या उपक्रमांविषयी जनजागृती करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. काटा ग्रामपंचायत येथे कार्यरत सीएससी केंद्राला भेट दिली. ३१ ऑगस्टपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टिने शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्याला दिल्या.

बातम्या आणखी आहेत...