आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुयारी मार्ग लवकरच पूर्ण:आ. रवी राणा यांनी आणलेल्या 50 कोटींच्या कामांचा घेतला आढावा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आ. रवी राणा व खा. नवनीत रवी राणा यांनी केंद्रासह राज्य सरकारकडे पाठपुरावा करून राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सहकार्याने ५० कोटींची विकासकामे मंजूर करून आणली आहेत. या कामांची आढावा बैठक अमरावती शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार,दि. २ रोजी झाली. या बैठकीत सर्व कामांचे उद्घाटन घेण्याच्या सूचना आ. राणा यांनी दिल्या.

ऑगस्ट २०२२ च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीच्या कार्यक्षेत्रात व बडनेरा मतदारसंघात मंजूर झालेला बडनेरा, अंजनगाव बारी, मालखेड १४ कि.मी. लांबीचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. अमरावती बडनेरा रस्त्यावर चमननगरजवळ एफओबी किंवा भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यासाठी २.५ कोटी रु. मंजूर झाले आहेत. ही कामे वेगाने करावीत, असे निर्देश आ. राणा यांनी दिले. खासदार नवनीत रवी राणा यांचे पुढाकाराने गोपालनगरच्या वर्दळीचा नेहमीचा प्रश्न सोडविण्यात आला असून ३९० मी. लांबी व ८.२५ मी. रुंदीचा गोपाल नगर आच्छादित भुयारी मार्ग व एकेरी पदचारी मार्गासाठी १३.६५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कामांचे डिझाईन व अंदाजपत्रक खासदार व आमदारांना महारेलच्या अधिकाऱ्यांनी दाखविले. नागरिकांच्या सोयीसाठी त्यात काही सुधारणा करण्याची सूचनाही खासदार व आमदारांनी केली.

या ५० कोटी रुपये मंजूर असलेल्या कामांचा आढावा बैठकीला मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर, महारेल अधिकारी लोखंडे, साबांवि कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे, आशिष उईके, शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता तायडे, देशमुख, उमेश ढोणे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील काळे, सुमती ढोके, आशिष गावंडे, युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी सुनील राणा, अजय मोरया, सचिन भेंडे, अजय जयस्वाल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...