आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटनेची तक्रार:आ. राणांच्या गोदामातून भोंगे लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार रवी राणा यांच्या भानखेडा ते मोगरा मार्गावरील शेतातील दोन गोदामातून चोराने ५ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा किराणा लंपास केला आहे. या घटनेची तक्रार गोदामाची देखरेख करणारे सुशील गजानन ठाकूर (५४, रा. संभाजीनगर) यांनी ४ सप्टेंबरला बडनेरा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सुशील ठाकूर हे आ. राणा यांच्या भानखेडा ते मोगरा मार्गावर असलेल्या शेतातील गोदामाची देखरेख करतात. भानखेडा बु. येथील शेतात दोन गोदाम असून, तेथे आ. रवी राणातर्फे गरीब व गरजूंना वाटण्यात येणारे किराणा साहित्य ठेवलेले होते. सुशील ठाकूर ४ सप्टेंबरला गोदामात गेले असता, त्यांना तेथील साहित्य अस्ताव्यस्त व कमी असल्याचे दिसून आले. चोरांनी गोदामातील किराणा साहित्य व साऊंड सिस्टिम भोंगे, एम्प्लीफायर युनिट लंपास केल्याचे लक्षात आले.

किराणासह साडेपाच लाखांचा मुद्देमाला गेला चोरीला
चोरट्याने गोदामाच्या दरवाजाला असलेली जाळी तोडून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी गोदामातून गरजूंना वाटपासाठी ठेवलेेले १ लाख ५५ हजारांचे सोयाबीन तेल, २१ हजारांची साखर, ३० हजारांची चणा डाळ, २० हजारांच्या १०० साड्या, ४८ हजार १०० रुपयांचे अॅल्युमिनियमचे भोंगे, ६३ हजार रुपयांचे ५८ एम्प्लीफायर असा सुमारे ५ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...