आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:आ. राणा यांचे घर, कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आ. रवी राणा व आ. बच्चू कडू यांच्यातील वाद आता शमला आहे. परंतु, एक दिवस आधीपर्यंत त्यांच्या चांगलाच वाद तापला होता. दरम्यान मंगळवार,दि. १ रोजी शहरातील नेहरू मैदानावर आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील ‘प्रहार’चे कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. ते बघता आ. रवी राणा यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थानी व राजापेठ येथील भोंगाडे काॅम्प्लेक्समध्ये असलेल्या त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही ठिकाणी पोलीसांचा ताफा तैनात होता. आ. राणा मुंबईत असले तर खासदार नवनीत राणा या शहरात आहेत. ते बघता राणा कुटुंबियांना कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशाने पोलिसांद्वारे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. हजारोच्या संख्येत ‘प्रहार’चे कार्यकर्ते आज शहरात उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...