आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन‎:आ. ठाकूर यांनी घेतले संत काशिनाथ‎ महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन‎

नांदगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेठ‎ माजी मंत्री तथा तिवस्याच्या आमदार ऍड. यशोमती‎ ठाकूर यांनी मंगळवारी संत काशिनाथ महाराज यांच्या‎ समाधीस्थळाचे दर्शन घेतले. संत काशीनाथ महाराज‎ यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी यावेळी प्रार्थना‎ केली. मंगळवारी संत काशिनाथ बाबा यांची पुण्यतिथी‎ आहे. त्यानिमित्त गावात सुरू असलेल्या धार्मिक‎ कार्यक्रमालासुद्धा भेट दिली. मंगळवारी पुण्यतिथी‎ महोत्सवाची सांगता होती.

त्यानिमित्त आ. यशोमती‎ ठाकूर यांनी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान छत्रपती‎ शिवाजी महाराज चौक स्थित संत काशिनाथ बाबा‎ समाधी मंदिर येथे त्यांच्या मूर्तीचे पूजन करून प्रार्थना‎ केली. त्यानंतर त्यांनी नवदुर्गा संस्थान येथील दुर्गा‎ मातेच्या मंदिरात जाऊन पूजन केले. यावेळी गावकरी‎ मंडळी व भक्तांसोबत आमदार यशोमती ठाकूर यांनी‎ संवाददेखील साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी‎ सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, सामाजिक‎ कार्यकर्ते राजेश बोडखे, सुमित कांबळे, शशी बैस,‎ सरपंच कविता डांगे, विनोद डांगे, मुकुंद पांढरीकर,‎ पंकज शेंडे, अमित यादव यांच्यासह इतर कार्यकर्ते‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...