आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी काम:अमरावती-अकोला महामार्गावरील डांबरीकरणाला सुरुवात; सलग 108 तास 728 मजूर 80 किमी मार्ग करणार तयार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अमरावती ते अकोला दरम्यान लोणी ते मूर्तिजापूर मार्गाचे 'बिटूमिनियस काँक्रीट' अर्थात रस्त्यावरील डांबरीकणचा शेवटचा थर टाकण्याचे काम शुक्रवारी सकाळी 7 वाजून 24 मिनिटापासून सुरू झाले. हे काम सलग 108 तास चालणार असून, या वेळी तब्बल 728 मजूर आळीपाळीने काम करणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली या काळात 75 ते 80 किलोमीटर डांबरीकरणाचे काम करण्याचा कंत्राटदार कंपनीचा प्रयत्न आहे. या कामाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होण्याची शक्यता असून, त्यासाठी स्वतंत्र चमू कामाच्या ठिकाणी दाखल झाला आहे.

असे होणार काम

लोणीपासून मूर्तिजापूरच्या काही अंतर अलीकडे सुमारे 31 किलोमीटर एका बाजूच्या दुहेरी लेनवर डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. ही एक लेन 9 मीटरची आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण 31 किलोमीटरची डबललेन 62 किलोमीटर असे मोजणार आहे. तसेच 31 किलोमीटरनंतर यू टर्न घेऊन मूर्तिजापूरकडून लोणीच्या दिशेने 9 किलोमीटर म्हणजेच दुहेरी लेनमुळे 18 किलोमीटर असे एकूण 75 ते 80 किलोमीटर काम होणार आहे. प्रत्यक्षात रस्त्याचे 40 किलोमीटरचे डांबरीकरण पूर्ण होणार असले तरीही दुहेरी लेन विचारात घेता हे काम 75 ते 80 किलोमीटरचे होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 'दिव्य मराठी'सोबत बोलताना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...