आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृवदना सप्ताह:जिल्ह्यात मातृवंदना सप्ताहाचा प्रारंभ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शुक्रवारपासून प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताहास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एकोणसाठ पैकी पन्नासहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांची यंत्रणा लाभार्थ्यांच्या घरोघरी पोहोचली. शासनाने आजपासून ७ सप्टेंबरपर्यंत प्रधानमंत्री मातृवदना सप्ताह राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

या सप्ताहांतर्गत पहिल्या दिवशी आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक तसेच वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी घरोघरी जाऊन गरोदर महिला व लाभार्थी महिलांच्या भेटी द्यायच्या होत्या. त्यानुसार यंत्रणेने उत्तम कामगिरी बजावली, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रमले यांचे म्हणणे आहे. उद्या, शनिवारी सर्व लाभार्थी महिलांची नोंदणी करून नंतरच्या दिवशी अखेरच्या टप्प्याच्या लाभासाठी कागदपत्रे सादर करावयाची आहेत. त्यानंतर प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन संबंधित लाभार्थी महिलांना आहारविषयक माहिती द्यायची आहे.

अशाप्रकारे आठवडाभराची ही कामगिरी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत उत्तम कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचे रँकिंग केले जाणार असून त्यांना उत्कृष्ट कामाबद्दलचे पारितोषिक दिले जाणार आहे.

काय आहे मातृवंदना योजना ?
ही योजना ही नोकरी नसलेल्या महिलांसाठी लागू आहे. या योजनेंतर्गत त्या महिलेला तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. रुग्णालयात नोंदणीनंतर एक हजार, गर्भधारणेनंतर दोन हजार आणि बाळ जन्माला आल्यानंतर लसीकरण झाल्यावर उर्वरित दोन हजार रुपये अशा पद्धतीने ही रक्कम दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...