आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधीच अतिवृष्टीने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पशुधनांवरही लम्पी आजाराने पुन्हा संकटात टाकले आहे. अशातच जिल्हाभरात लम्पी आजाराने आतापर्यंत ९३० गावांना विळखा घातला. यात सुमारे ३५ हजार ८८६ जनावरे बाधित झाली आहेत. त्यापैकी ३१ हजार २४६ पशुधन लम्पी आजारातून बरे झाले आहेत. अजूनही ४ हजार ६४० पशुधनावर लम्पीचा प्रादुर्भाव आहे. २ हजार ५०० पशुधनाला मृत्यूने गाठले आहे.
यामुळे संकटात सापडलेल्या २५०० पशुपालकांपैकी जवळपास १ हजार ९२० पशुपालक पात्र ठरले असून १ हजार ९०२ नुकसानग्रस्त पशुपालकांना नुकसानभरपाई मिळाली आहे. त्यासाठी आजवर ४ कोटी ९९ लाख रुपये निधी वाटप झाला आहे.
गत ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात लम्पी आजाराने एन्ट्री केली होती. तेव्हापासून आतापर्यंत १४ तालुक्यांतील ९३० गावांतील पशुधनाला लम्पीने ग्रासले आहे. हा आकडा आतापर्यंत ३५ हजार ८८२ वर जाऊन पोहोचला आहे. यातील ३१ हजार २४६ पशुधन लम्पी आजारातून बरे झाले आहेत, तर ४ हजार ६४० एवढी जनावरे उपचार घेत आहेत. या जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, काही जनावरे गंभीर आजारी असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. असे असले तरी पशुधन दगावण्याचा आकडा हा २ हजार ५०० वर गेला आहे. त्यामुळे लम्पी आजारातून पशुधनाचा बचाव करण्यासाठी पशुधन पालकांनी अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. तसेच पशुसंवर्धन विभागही बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांचे पशुधन दगावले अाहे त्यांच्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. आजवर १९२० पधुपालक पात्र ठरले आहेत. त्यापैकी १९०२ नुकसानग्रस्त पशुपालकांना अनुदान देण्यात आले. आजवर ४ कोटी ९९ लाख रुपये वाटप केले आहेत.
एक हजार ९०२ पशुपालकांना मदत
जिल्ह्यात बाधित जनावरांचे प्रमाणे अधिक वाटत असले तरी बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत जिल्हाभरात पशुधनाचे ९९ टक्क्यांच्या वर लसीकरण पूर्ण झाले. १ हजार ९०२ पशुपालकांना मदत मिळाली आहे. डॉ. संजय कावरे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.