आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:कामांना चालना देण्यासाठी मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करा; वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाईंचे निर्देश

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा नियोजन समितीच्या चालू वर्षाच्या नियोजनानुसार अपेक्षित कामांचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. अपेक्षित कामे नियोजनानुसार पूर्ण होण्यासाठी वेळेत कार्यवाही व्हावी, असे निर्देश वित्त व नियोजन, गृह, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी रविवार, १ मे रोजी येथे दिले.

गृह राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री देसाई यांनी वित्त व नियोजन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आदी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. विशेष पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, एम. एम. मकानदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी विसाळे, नरेंद्र येते, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, हर्षल चौधरी, जिल्हा रोजगार व कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके आदी यावेळी उपस्थित होते.

नियोजनानुसार अपेक्षित कामांवर प्राप्त निधी खर्ची पडण्यासाठी सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात यावी. विविध विभागांकडून परिपूर्ण प्रस्ताव मागवून घ्यावेत. नियोजित कामांची निविदा प्रक्रिया काटेकोरपणे व वेळेत राबवावी. नियोजन विभागाने सर्व विभागांकडून ही प्रक्रिया करून घ्यावी जेणेकरून अपेक्षित विकासकामांना वेळेत चालना मिळेल, असे राज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...