आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:एसटीचे स्मार्ट कार्ड नसले, तरी प्रवासात सवलत ; आतापर्यंत जिल्ह्यात सव्वा लाख कार्ड वाटप

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत या योजनेसाठी जिल्ह्यात १ लाख २६ हजार ०८५ व्यक्तींची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी तसेच रुग्णांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. एसटी महामंडळाने गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी तीन वर्षापासून स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेक सवलत धारकांना स्मार्ट कार्ड काढले आहे. स्मार्ट कार्ड असणाऱ्या नागरिकांनाच यापुढे बसमध्ये प्रवाशाची सवलत दिली जाणार आहे. मात्र, महामंडळाने ज्या सवलत धारकांनी एसटीचे अद्याप एसटीचे स्मार्ट कार्ड काढलेले नाही, अशा नागरिकांसाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यात आजवर १ लाख २६ हजार ८५ नागरिकांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले आहे. ही मुदत असेपर्यंत सवलत धारकांना एसटीचे स्मार्ट कार्ड नसले तरी बसमधून सवलतीमध्ये प्रवास करता येणार आहे. एसटीकडे विविध योजनेचे स्मार्ट कार्ड आहेत. त्यांची नूतनीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यासाठी करावे लागणारे रिचार्ज होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सर्व्हरमुळे अडचण असल्याचे सांगितले जात आहे.

२९ समाज घटकांना प्रवासी भाड्यात सवलत एसटी महामंडळातर्फे दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विविध राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त नागरिक, शालेय विद्यार्थी, पत्रकार अशा प्रकारच्या २९ समाजघटकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. या सवलत धारकांना स्मार्ट कार्ड नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे.

गैरसोय होऊ नये स्मार्ट नोंदणीची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. तसेच मुदत असेपर्यंत स्मार्ट कार्ड नसले तरी सवलत धारकांना बसमधून प्रवास करता येणार आहे. त्वरीत नोंदणी करावी. नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

बातम्या आणखी आहेत...