आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रम:जिल्हा अंतर्गत बदलीबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग एक व तीनमधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पदांवरही बदली मागता यावी, तसा बदल नवीन बदली प्रक्रियेत करावा, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे. नवीन बदली प्रक्रियेबाबत स्पष्टता नसल्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या संवर्ग १ व ३ मधील शिक्षकांना केवळ बदली पात्र शिक्षकांच्या जागा मिळतील, असे बदली प्रक्रिया पार पाडत असलेल्या प्रणालीमध्ये दिसत आहे. शासन आदेशानुसार शिक्षकांना केवळ बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येतील, असेही सांगितले जात आहे; परंतु या मुद्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांची जागा मागता येईल व शाळेत बदलीपात्र शिक्षक नसेल, तर बदली होणार नाही, असे असून याचा अर्थ निव्वळ रिक्त पदावर बदली मागता येणार नाही, असा कयास लावला जात आहे. जे पद संवर्ग २ व संवर्ग ४ घेऊ शकतात ते पद संवर्ग १ व ३ यांना मात्र बदलीने दिले जात नसेल, तर तो त्या संवर्गातील शिक्षकांवर अन्याय आहे.

समानीकरण पद जिल्हांतर्गत बदलीमध्ये कोणालाच मिळत नाही; परंतु निव्वळ रिक्त पद संवर्ग २ व ४ यांना उपलब्ध असेल, तर नैसर्गिक न्यायाने संवर्ग १ व ३ यांनाही या जागा बदलीने मागता आल्या पाहिजेत, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. बदली संवर्गामध्ये येऊनही रिक्त पदावर बदली मिळत नसल्याने शिक्षक गोंधळलेल्या स्थितीत आहेत. याबाबत शासन आदेश व पोर्टलमधील प्रथमदर्शनी दिसत असणारी विसंगती दूर करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...