आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:विलंब होणाऱ्या अनुदानाबाबत महसूलच्या‎ निषेधार्थ काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन‎

शेंदुरजनाघाट‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान‎ शासनाकडून वरुड तहसील‎ कार्यालयाला बरेच दिवसांपासून‎ प्राप्त झालेले आहे. मात्र तहसील‎ कार्यालयाने ते अद्यापही अनेक‎ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले‎ नाही. वारंवार निवेदने देऊनही‎ त्याची दखल न घेतल्याने सोमवारी‎ तहसील कार्यालयासमोर मुलताई‎ चौकात शेतकऱ्यांसमवेत चक्का‎ जाम आंदोलन करण्याचा इशारा‎ काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी दिला‎ होता. त्या अनुषंगाने चक्काजाम‎ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष‎ वेधण्यात आले.‎

या वेळी काही शेतकऱ्यांनी‎ तहसील कार्यालयाच्या मेन गेटवर‎ चढून काळी फीत व झेंडे दाखवून‎ लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा‎ निषेध केला. अतिवृष्टीचे पैसे‎ शेतकऱ्यांच्या खात्यात न जमा‎ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा‎ गोंधळ वादक मंडळीने आपल्या‎ गायन व वादनातून व्यक्त केल्या.‎ दुपारी साडेबारा वाजता सुरू‎ झालेल्या आंदोलनादरम्यान‎ शेतकऱ्यांच्या समस्या‎ तहसीलदारांसमोर मांडण्यात‎ आल्या.

लेखी स्वरूपात पत्र‎ दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार‎ नाही, असा पवित्रा आंदोलकांनी‎ घेतला. ३० नोव्हेंबरपर्यंत‎ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात‎ अतिवृष्टीचे पैसे जमा हाेतील,‎ असे लेखी आश्वासन‎ तहसीलदारांनी दिल्यानंतर‎ आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र‎ ३० नोव्हेंबरपर्यंत तालुक्यातील सर्व‎ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात‎ अतिवृष्टीचे पैसे जमा न झाल्यास‎ यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा‎ इशारा ठाकरे यांनी उपस्थित‎ शेतकऱ्यांद्वारा तहसील प्रशासनाला‎ दिला. या आंदोलनात‎ तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी‎ सहभाग नोंदवला होता.‎

बातम्या आणखी आहेत...