आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालानुसार 16 सरपंचांपैकी 12 सरपंच काँग्रेसचे निवडून आले आहेत. तर 4 जागांवर भाजप गटाला समाधान मानावे लागले. सकाळी 10 वाजता सुरू झालेली मतमोजणी अवघ्या दीड तासांत पूर्ण झाली.
विजयी सरपंचांमध्ये निंभा - गजानन इंगळे, धोत्रा - सुनिता शिनगारे, कोहळा - आरती सोळंके, दहिगांव घावडे - पवन धावडे, दिघी कोल्हे - प्रशांत कोल्हे, मांजरखेड - पल्लवी देशमुख, कवठा कडू - अभिजित राजनेकर, राजना - धनंजय गावंडे, कळमगांव - शिवाजी वाघ, कळमजापूर - अरविंद गुडधे, सावंगी संगम - पंकज शिंदे, भीलटेक - शुभांगी चौधरी, बागापूर - प्रियंका चौधरी, सोनगाव - श्रद्धा राऊत, टेम्भुर्णी - मंगला पीजदे, मांडवा प्राजक्ता इंगोले यांचा समावेश आहे. काही ठिकाणी अतिशय चुरशीची तर काही गावांमध्ये ही निवडणूक एकतर्फी झाली. सर्व ग्रामपंचायती मिळून सदस्य पदासाठी १२२ जण विजयी झाले. त्यात विविध पक्ष आपापला दावा करीत आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली ग्राम पंचायतीची रणधुमाळी आजच्या निकालांती शांत झाली.
येथील तहसील कार्यालयात एकूण आठ टेबलांवर मातमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती, एकूण सहा फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण झाली. मतमोजणीस्थळी सकाळी 8 वाजेपासूनच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्यासोबत, गटविकास अधिकारी संजय खारकर, एस एस उमक, गटशिक्षणाधिकारी मुरलिधर राजनेकर, एस जे चव्हाण, मीना मसतकर, ए आर चवरे, सावन जाधव, गजेंद्र पाटील, सुभोध गजभिये, महेश सोनोने यांनी काम पाहिले. यावेळी ठाणेदार सुनील किंगे यांच्या नेतृत्वात शिवाजी घुगे व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय - प्रा. जगताप
कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील व तळागळातील जनतेशी टिकवून ठेवलेले संबंध, त्यांच्या लहान मोठ्या कामात नेहमी धावून मदत करणे, विकासाचे राजकारण याचाच विजय झाला. आजच्या काँग्रेसच्या विजयाने विद्यमान आमदारांची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे सांगत चांदुर रेल्वेत 16 पैकी 12, धामणगाव रेल्वे तालुक्यात 7 पैकी 5, नांदगाव तालुक्यात 17 पैकी 8 सरपंच काँग्रेसचे असल्याचा दावा माजी आमदार प्रा. जगताप यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.