आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ते उत्साहात:कर्नाटकातील विजयाचा‎ काँग्रेसच्या वतीने जल्लोष‎, राजकमल चौकात फटाके फोडून विजयोत्सव साजरा

प्रतिनिधी | अमरावती‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकमधील विजयाचा आनंद साजरा करताना काँग्रेसचे पदाधिकारी‎, कार्यकर्ते.‎ - Divya Marathi
कर्नाटकमधील विजयाचा आनंद साजरा करताना काँग्रेसचे पदाधिकारी‎, कार्यकर्ते.‎

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या‎ कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा‎ निकाल स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने‎ कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली‎ असून, स्वबळावर सत्ता स्थापन करेल‎ असे चित्र निर्माण झाले आहे. त्याच‎ विजयाचे शहरासह जिल्हा काँग्रेसच्या‎ वतीने राजकमल चौकात विजयोत्सव‎ साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस‎ पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारवर‎ हल्लाबोल केला. यावेळी फटाक्यांची‎ आतिषबाजी आणि काँग्रेसचा जयघोष‎ यामुळे राजकमल चौकात उत्साहाचे‎ वातावरण निर्माण झाले होते.‎

कर्नाटकमधील नागरिकांनी भाजपच्या‎ खोट्या प्रचाराचा सुपडा साफ केला‎ आहे. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने‎ घेतलेली भूमिका, त्याचप्रमाणे‎ जनकल्याणकारी पाच महत्त्वपूर्ण‎ विषयांचे आश्वासन राहुल गांधी, काँग्रेस‎ अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व स्थानिक‎ नेतृत्वांनी दिली होती. त्याच्याच‎ समर्थनार्थ कर्नाटकातील जनतेने स्पष्ट‎ बहुमत देऊन काँग्रेस पक्षाला मते देऊन‎ विजयाचा राजमार्ग प्रशस्त केला.‎ पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण निवडणूक‎ धार्मिक प्रचारावर केंद्रित करण्याचा डाव‎ जनतेने सपशेल हाणून पाडला असल्याचे‎ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले.‎

माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख,‎ शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर‎ विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद‎ चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार,‎ प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश‎ चिटणीस असिफ तवक्कल, संजय वाघ,‎ भालचंद्र घोंगडे, डॉ.अंजली ठाकरे,‎ जयश्री वानखडे, प्रदीप हिवसे, शोभा‎ शिंदे, आशा अघम, किरण साऊरकर,‎ रफिक चिकुवाले, हाजी नजीर खान,‎ फिरोज खान, राजेंद्र शेरेकर, अभिनंदन‎ पेंढारी, अब्दुल रफिक, महेश व्यास,‎ मुकेश छांगानी, जावेद साबीर, यासिर‎ भारती, नीलेश गुहे, अनिकेत ढेंगळे,‎ वैभव देशमुख, समीर जवंजाळ, संकेत‎ कुलट, संकेत साहू, गुड्डू हमीद, पंकज‎ मांडळे आदी उपस्थित होते.‎