आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीची पाहणी:कृषिमंत्र्यांच्या दिमतीला काँग्रेस कार्यकर्ते; तालुक्यात चर्चेला उधाण

उमरखेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शनिवारी रात्री उमरखेड जवळील वरूड बिबी फाट्यावरील शेतात थांबले. मात्र त्यांच्या या दौऱ्यात त्यांची सरबराई करताना काँग्रेस पक्षातील नेते, कार्यकर्ते यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा शनिवारी नुकसानग्रस्त शेती पाहणी नियोजीत दौरा होता. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष शेतीत जावुन पिकाची पाहणी करून काही घोषणा करतील अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होती. परंतू यवतमाळ येथून निघाले तेव्हापासून कुठे थांबायचे, कुठे जेवण करायचे ( फोटोसेशनसाठी ) हे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरुन झाल्याची चर्चा आहे. कारण वरुड बिबी जवळील सुकळी (ज) येथील काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरुन भाकर, पिटलं बनवुन तयार ठेवण्यात आले होते.

त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही सरबराई उपस्थितांना दिसून आली. दुसरीकडे मात्र भाजपचे आमदार नामदेव ससाने यांना या जेवणाची कल्पनाही नव्हती हे विशेष. शेवटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत नुकसान भरपाई देऊ एवढे सांगून अब्दुल सत्तार नांदेड कडे रवाना झाले. याही वेळेस निरोप देताना आवर्जुन काँग्रेस कार्यकर्तेच पुढे होते. काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री यांच्यासमोर कडाडून काही मागणी होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र या घडलेल्या प्रसंगावरून सरबराईत काँग्रेस असल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. कुणी म्हणतेय शिंदे गटात ‘त्या ‘ काँग्रेस नेत्याचा प्रवेश होणार आहे, तर कुणी म्हणतेय विदर्भाची शिंदे गटाची जबाबदारी त्यांना मिळणार असून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांना घेणार अशी चर्चा आज उमरखेड तालुक्यात रंगल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...