आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईला केंद्र सरकार जबाबदार:महागाई विरोधात काँग्रेसचा जिल्ह्यात लढा तीव्र

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने शुक्रवारी राजकमल चौकात निदर्शने केलीत. यावेळी केंद्र शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर काँग्रेसने लढा उभारला असून, काँग्रेस सर्वसामान्य जनतेसोबत हा लढा आणखी तीव्र करण्याचे येणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

देशात महागाई ,बेरोजगारी प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे सामान्य जनता हतबल झाली आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलिंडर भाव, जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचसोबत युवकांचा कोणताही विचार न करता अग्निपथ योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांची संख्या आणखी वाढणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

सध्या देशात हुकूमशाही शासन सुरू असून, लोकशाहीची पायमल्ली होत आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर आंदोलन उभे केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेसच्या वतीने राजकमल चौकात मोदी शासनाविरोधात निदर्शने केली. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी याचा निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून तीव्र नारेबाजी केली.

यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश प्रवक्ते अॅड.दिलीप एडतकर, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश सचिव आसिफ तवक्कल, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. अंजली ठाकरे संजय वाघ, बाळासाहेब भुयार, विनोद मोदी, आनंद भामोरे,भैय्या निचळ, अब्दुल रउफ, अशोक रेवस्कर, अभिनंदन पेंढारी, प्रदीप हिवसे, सलीम बेग, अनिल माधवगढीया, भालचंद्र घोंगडे, रमेश राजोटे, शोभा शिंदे, अर्चना सवई, जयश्री वानखडे, देवयानी कुर्वे, मैथिली पाटील, सविता धांडे, नीलेश गुहे, अमोल इंगळे, वैभव देशमुख, समीर जवंजाळ, अनिकेत ढेंगळे, एजाज पहेलवान, शक्ती राठोड, सुरेश रतावा, गजानन राजगुरे, यासिर भारती, संकेत कुलट, किर्तीमाला चौधरी, सुजाता झाडे, अनिल काझी, संजय बोबडे, संदेश सिंघाई, सुरेश कनोजिया, प्रा.अनिल देशमुख, दिनेश खोडके, अबुल रफिक, विक्की वानखडे, नितीन कदम, राजेश चौहाण, सुनील पडोळे, सुनील जावरे, गोपाल धर्माळे, विजय वानखडे, संतोष केशरवानी, बबन काळमेघ, विजय आठवले, गजानन जाधव, , मुकेश छागाणी ,डॉ.मातीन अहेमद, डॉ.मजहर अली, अश्फाक खान, अनिल तायडे, अमर भेरडे, सुरेश इंगळे, सुजल इंगळे, जयश्री श्रीरामे, गजानन रडके, मोहम्मद निजाम,अरुण बनारसे, किरण सौरकर, शरद ठोसरे, नदीम मुल्ला,अज्जू ठेकेदार, फिरोज शहा, दत्तात्रय धावडे, भैय्या देशमुख, राजू गोमकाळे, अनिल तट्टे, जनार्धन गावंडे, अजय कुबडे, दिगंबर यावलीकर, नितीन काळे, अरुण जयस्वाल, अचल कोळे, श्याम प्रजापती, प्रा.बि.टी.अंभोरे, कांचन खोडके, वंदना थोरात, शीतल देशमुख, सतीश काळे, राजाभाऊ चौधरी, प्रकाश कोकणे, अब्दुल आजीम, सुनील महल्ले, राजेंद्र सुरोशे, विनोद सुरोशे, मुकेश गिरी, नीलेश कांचनपुरे, पिंटू यादव आदी सहभागी झाले होते.

देशाची श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याच्या मार्गावर : शेखावत
महागाई, बेरोजगारी बघता दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण झालेले आहे. रोजगार नष्ट करून करोडो युवकांना बेरोजगार करण्याचे काम केंद्र शासन करीत आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेले सर्व आश्वासन आज खोटे ठरत आहेत. डॉलरच्या तुलने रुपयापुढे गेलेला आहे. २०१४ आधी काँग्रेसच्या सत्ताकाळात सिलिंडर दर ४५० रुपये होते, तसेच त्यावर २०० रुपये सबसिडी सुद्धा होती. मात्र, आज घरगुती सिलिंडर दर ११०० रुपये झालेले आहे. त्याच सोबत देशाची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली असून, देशाला श्रीलंकेच्या मार्गावर नेण्याचे काम केंद्र शासनाचे सुरू असल्याचा आरोप शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...