आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, हर घर नल उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबास दररोज प्रतिव्यक्ती ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. वाड्या, वस्त्यांवर थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असून, जिल्हाभरातील ४ लाख ४५ हजार ४० कुटुंबांची तृष्णातृप्ती होणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ५० हजार सात एवढ्या कुटुंबांना नळजोडणी दिली आहे.
ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील ६६१ गावांमध्ये योजना राबवण्यात येत आहे. आतापर्यंत २४ गावांमध्ये योजना पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ४५ हजार ४० कुटुंबातील व्यक्तींची या उपक्रमामुळे तहान भागवली जाणार आहे. जिल्ह्यातील ६६१ गावांतील कामांसाठी २५८ कोटी ४२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.
या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निविदा काढण्यात आल्या. या कामांपैकी ६५८ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, त्यानुसार २४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. योजना पूर्ण झालेल्या गावात प्रतिव्यक्ती प्रतिदिनी ५५ लिटर प्रमाणे थेट नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. २०२४ पर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देण्याचे शासनाने उद्दिष्ट आहे. त्यानुसार हर घर नल, हर घर जल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत या भागातील जलजीवन मिशन अंतर्गत या नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत चार लाख ४५ हजार ४० कुटुंबापैकी तीन लाख ५० हजार सात कुटुंबांना नळजोडणी दिलेली आहे, तर ९५ हजार ३३ कुटुंबांना नळजोडणीचे काम सुरू आहे.
पाण्यासाठी नागरिकांना आता वण-वण भटकावे लागणार नाही
एका कुटुंबात किमान ४ जण असतील तर त्यांना प्रत्येकी ५५ लिटरनुसार एकूण २४० लिटर पाणी मिळणार आहे. त्यामुळे अशा नागरिकांना जलजीवन मिशनमुळे नदी, ओढे, विहिरीच्या पाण्यावर यापुढे अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच पाण्यासाठी वण-वण भटकावे लागणार नाही. थेट घरात नळ येणार असल्याने घरबसल्या नळाद्वारे निर्मळ जल पिण्यासाठी मिळणार आहे.
तालुकानिहाय नळजोडणीची संख्या
अचलपूर ४३,९१४
अमरावती ३६, ८८७
अंजनगाव सुर्जी २६,४७८
भातकुली २४,८५०
चांदूर बाजार ३९,९४५
चांदूर रेल्वे १८,८८२
चिखलदरा ३१२८७
दर्यापूर ३९,०६७
धामणगाव रेल्वे २८,२२०
धारणी ३२,०२९
मोर्शी ३५,०४४
नांदगाव खंडेश्वर २६,३७४
तिवसा २३.३२१
वरुड ३८,७३८
एकूण ४,४५,०४०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.