आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील खड्डे आता मृत्यूचे सापळे ठरत आहेत. शनिवारी (दि. ३) सकाळी पावणेनऊच्या सुमारास पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या ड्युटीवर जात असलेल्या एका २४ वर्षीय युवतीचा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील भातकुली जवळ घडली आहे. भूमिका महादेव सोमोसे (२४) रा. शेंदरजना खुर्द असे मृत युवतीचे नाव अाहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केले. त्यामुळे दोन्ही बाजूने जवळपास ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मृत ही माजी पं. स. सभापती महादेव सोमोसे यांची मुलगी आहे. उर्वरित. पान ३
संतप्त नागरिकांचा तीन तास रास्ता रोको
खड्ड्यांमुळे नेहमीच अपघातामध्ये नाहक बळी जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सुमारे तीन तास चक्काजाम केला. त्यामुळे नागपूर व औरंगाबादकडून येणारी वाहतूक खोळंबली होती. परिणामी नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर दोन्ही बाजुने सुमारे ३ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या
या वर्षात गेला ३६ जणांचा बळी
तालुक्यातील नागपूर-एक्स्प्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा झाला आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावर ६० अपघात झाले आहेत. त्यात ३६ जणांना जीवाला मुकावे लागले आहे. ही संख्या फक्त तळेगाव दशासर पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. या मार्गाने मुंबईला जाण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने दिसवरात्र त्यावर वाहतूक सुरू असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.