आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसद्वारे मजीप्राचा निषेध:शहरात 8 ते 10 दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा; तातडीने सुधार करण्याची मागणी

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा असल्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थितपणे करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाची जबाबदारी असताना गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पिण्याचे पाणी अत्यंत गढूळ (दुषित) येत आहे.

नाईलाजणे शहरवासियांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. हे दुषित पाणी प्यायल्यामुळे शहरातील नागरिकांना डायरिया सारखे आजार होत आहेत. यामुळे नागरिकांना दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. शहरातील जनतेचे असे अतोनात हाल होऊ नये, म्हणून मजीप्रात शुक्रवारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलींद चिमोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन केल्यानंतर निवेदन सादर करण्यात आले.

सध्या शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अत्यंत सुमारपणे सुरू असल्याने शहरवासिय त्रस्त झाले आहेत.एकतर विविध भागात पाणीपुरवठ्याची ही अतिशय विचित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरतील महिलांना त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी मजीप्राने तातडीची बैठक बोलावून त्याचे नियोजन करावे व शहरातील प्रत्येक भागांत पाणीपुरवठ्याचा वार आणि वेळ याबाबत सार्वजनिक सूचना जाहीर कराव्यात असे बैठकीत ठरविण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता सोळंके यांनी सर्व मुद्दे लक्षात घेता दिलगिरी व्यक्त केली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा, यासाठी नियोजन करण्यात येईल व पाणीपुरवठ्याचा वार आणि वेळ याची सार्वजनिक सूचना जाहीर करण्यात येईल, या दोन्ही मागण्या या वेळी मान्य करण्यात आल्या.

मजीप्राने गढूळ पाण्याचे नियोजन तसेच पाणी पुरवठ्याचा वार आणि वेळेचे नियोजन केले नाही तर मजीप्रा अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पिण्यास बाध्य करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...