आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावाचा पाठपुरावा:पाण्याची समस्या सोडवण्यासाठी समन्वयाने कामे करा ; खासदार बोंडे यांचे बैठकीत आवाहन

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावात उद्भवलेली पाण्याची समस्या तातडीने सोडवतानाच महापालिका राबवत असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अमरावती-नेरपिंगळाई-मोर्शी मार्गावरील नादुरुस्त जलवाहिनी बदलवण्याच्या प्रस्तावाचा शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना देखील खा. डॉ. बोंडे यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. बोंडे यांनी सोमवारी विविध विषयांचा आढावा घेतला. या बैठकीला माजी महापौर चेतन गावंडे, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे, मनपाचे शहर अभियंता रवी पवार, पीएमएवाय योजनेचे कार्यकारी अभियंता जीवन सदार, मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. भुयारी गटार योजनेला गती देण्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करावे. रस्त्यावरील अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील गटारींना झाकणे लावावीत. शहरात फेरीवाल्यांचे प्रमाण बघता त्यांच्यासाठी असलेल्या नियमांची माहिती, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करावे, आदी मुद्देही या बैठकीच्या अजेंड्यावर होते.

‘सिटी मोबॅलिटी’ योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती डॉ. बोंडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. वास्तुशिल्प अभियंता संजय राऊत यांनी या योजनेचे सादरीकरण केले.बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. रवींद्र खांडेकर, मनपाचे माजी सभागृह नेते तुषार भारतीय, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, माजी उपमहापौर कुसुम साहू, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, सुनील काळे व रश्मी नावंदर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...