आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग तिसऱ्या दिवशी ब्लास्ट:​​​​​​​कोरोनाने घेतले पुन्हा 26 बळी; आजपर्यंतची सर्वोच्च संख्या, नव्याने आढळले 593 बाधित

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9 दिवसांत हिंदू स्मशानभूमीत 156 कोरोना बळींवर तर इतर 75 मृतदेहांवर अंतिम संस्कार

शहरात ८ एप्रिलपासून जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्ण येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून अाजवर (दि.१९) अर्थात १२ दिवसांत जिल्ह्याबाहेरील ४३ कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यात आले. हे कोरोना बाधित गंभीर स्थितीत अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा येथेच उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नागपुरातून उपचारासाठी आलेल्या २८ तर इतर शहरांमधून आलेल्या १५ मृतांचा समावेश आहे.

८ एप्रिलपासून शहरात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, वाशीम, बुलडाणा, काटोल, यवतमाळसह इतर काही शहरांमधील १२५ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी ४३ अर्थात ३४ टक्क्यांच्या वर रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढत असल्यामुळे दोन गॅस दाहिन्या अपुऱ्या पडत असून बाहेर रिक्त जागेवर अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नाही. ९ दिवसांत हिंदू स्मशानभूमीत १५६ कोरोना बळींसह ७५ मृतकांवर अंत्यसंस्कार : हिंदू स्मशान भूमीत जिल्ह्यातील कोरोना मृतांसह जिल्ह्याबाहेरील मृतांंवरही अंत्य संस्कार केले जात असून ११ ते १९ एप्रिल या ९ दिवसांत १५६ कोरोना मृतांसह ७५ इतर मृतकांवर अंत्य संस्कार करण्यात आले. त्यामुळे येथे जागाच शिल्लक नाही.

खुल्या जागेवर अंत्यसंस्काराला परिसरातील रहिवाशांचा विरोध
हिंदू स्मशानभुमीला लागून असलेल्या श्रीनाथवाडी, करवा लेआऊट, कोल्हटकर काॅलनी, भेरडे लेआऊट, देसाई लेआऊट येथील रहिवाशांनी खुल्या जागेवर कोरोना रुग्णांचा अंतिम संस्कार करण्यास विरोध केला अाहे.चिमणीतून निघणारी काळी पावडर घराच्या अंगणात पसरत आहे. गॅस दाहिनीच्या चिमणीतून सतत धूर निघत असल्यामुळे येथील ओटे व गॅस दाहिनीची संख्या वाढवू नये, अशी मागणी श्रीनाथवाडी विकास समितीद्वारे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

रेमडेसिविरनंतर आता आयसीयू, ऑक्सिजन बेडचा ही तुटवडा !
अमरावती|गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या रेमडेसिविरच्या तुटवड्यानंतर आता अमरावतीत आयसीयू आणि ऑक्सिजन बेडचा ही तुटवडा जाणवू लागला आहे. खुद्द जिल्हाधिकारी यांनी या माहितीला दुजोरा दिला असून ऑक्सिजन आणि कोविड लशींचा पुरवठा जसजसा होत राहिल, त्या प्रमाणात त्याचा वापर केला जाईल, असे म्हटले आहे. दैनंदिन ब्रिफींगमध्ये त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७१२ आणि उर्वरित.पान ४

शहरात आणखी चार नव्या शवदाहिन्या बसवण्यात येणार
कोरोना मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे स्मशानभूमीत जागा कमी पडायला लागली आहे. त्यामुळे अमरावती शहरात आणखी चार नवीन शवदाहिनी लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनासह महानगर पालिका प्रशासनाने घेतला आहे. याअंतर्गत हिंदू स्मशानभूमीत एक, शंकरनगर येथील स्मशानभूमीत दोन व विलास नगर येथील स्मशानभूमीत एक शवदाहिनी, जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने शंकरनगर येथे दोन व विलास नगर येथे एक शवदाहिनी बसवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...