आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा मृत्यू:तीन महिन्यानंतर कोरोनाचा मृत्यू, नऊ रुग्ण

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल तीन महिन्याच्या खंडानंतर कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी वैद्यकीय दप्तरी करण्यात आली. त्याचवेळी ९ नवे रुग्णही नोंदवले गेले. विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार, जिल्ह्यात गुरुवार, २२ सप्टेंबर रोजी कोरोनाचे नऊ नवे रूग्ण आढळून आले. त्याचवेळी चौघांना सुटी मिळ‌ाली. दरम्यान,आजच्या नव्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २४ पर्यंत वाढली आहे. आज मृत झालेली व्यक्ती येथील कॅम्प भागाची रहिवासी असून, ते ७८ वर्षीय पुरुष असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचवेळी बाधित झालेल्या नऊ जणांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे आजच्या नऊ नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार १८ वर जाऊन पोहोचली आहे.

बातम्या आणखी आहेत...