आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कर्जमाफीची आशा:थकीत कर्जाबाबत सहकार विभागाने माहिती मागविली, पण नोंदीत अडचणी

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोराना संकटात निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत सहकार विभागाने माहिती मागविली आहे.

अमरावती जिल्ह्यात सुध्दा जिल्हा निबंधक कार्यालयाकडून सहकार विभागाने काढलेल्या आदेशाच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील सहाय्यक निबंधकाच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँक व जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कोराना काळात मृत्यू झाल्यास माहिती मागविल्याा जात आहे. ही माहिती गावस्तरावर संकलीत करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने ही यादी पुर्ण होण्यास विलंब होत आहे.

कोरोनाने मृत्यु झालेल्या शेतकरी कर्जदारांना शासनाने कर्जमाफीचा दिलासा देण्यासाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देश दिले. अमरावती जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक झळ बसली. शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, पतसंस्थांकडून कर्ज घेतले. दरम्यान कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबिय अडचणीत आले. कोरोनाने मृत झालेल्या शेतकऱ्यांचे नाव, मंजुर कर्जाची रक्कम, तारण मालमत्तेचे तपशील, थकीत कर्जाची एकूण रक्कम, एनपीए वर्गवारी, वसुलीची सध्यास्थिती अशा ८ मुद्यांची माहिती संकलीत करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवळे यांनी ११ नोव्हेंबर रोजी विभागीय सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधकांना ही माहिती संकलीत करण्याबाबत निर्देश दिले. मात्र अमरावती जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातून कोरोनाने मृत झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांची आकडेवारी मिळविण्यास अडचणी येत आहे.

..

कोरोनाने मृत्यू मात्र नोंद नाही

अचलपूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कर्जदार शेतकऱ्यांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. मात्र कुटुंबियांनी तथा प्रशासनाने मृत्यु दाखला घेताना व देताना कोरोनाने मृत झाल्याची नोंद न केल्याने त्या लाभापासुन मृत कर्जदार शेतकऱ्याच्या कुटुंबियांना त्याचा लाभ मिळण्यास अडचणीचे ठरत आहे.

..

माहिती संकलन सुरू; अद्याप आकडेवारी आली नाही

अचलपूर तालुक्यात कर्जदार शेतकऱ्यांची कोरोनाने मृत्यू झाल्याबाबतची माहिती सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून संकलीत करणे सुय आहे. मृत्यू दाखल्यावर कोरोनाचा उल्लेख असल्यासच नाव यादीत समाविष्ट करता येते. सध्या माहिती घेणे सुरू असले, तरी आकडेवारी निश्चितच व्हायची आहे.

अच्युत उल्हे, सहाय्यक निबंधक, अचलपूर

बातम्या आणखी आहेत...