आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णसंख्या:कोरोनाने डोके वर काढले; सक्रिय रुग्णसंख्या 25 वर ; दिवसभरात 6 नवे रुग्ण

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी दिवसभरात ६ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे जिल्ह्यात या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु त्याचवेळी कोणताही धोका नाही, असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अवघ्या २४ तासांत सहा रुग्ण आढळून येण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. नव्या सहा रुग्णांमध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. विशेष असे की यातील तीन रुग्ण शहराच्या जेल रोड, नवाथे प्लॉट व खापर्डे बगीचा या क्षेत्रातील रहिवासी असून उर्वरित तिघे चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम, अमरावती तालुक्यातील वलगाव आणि वाठोडा येथील रहिवासी आहेत. या सर्वांचा वयोगट २० ते ५० या दरम्यानचा आहे.

त्यामुळे लागण झालेल्यांमध्ये तरुण व प्रौढ अशा दोन्ही प्रकारच्या नागरिकांचा समावेश आहे. आजच्या सहा नव्या रुग्णांमुळे अमरावती जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या थेट २५ वर पोचली असून त्यातील १६ जण ग्रामीण भागाचे तर उर्वरित नऊ जण अमरावती महापालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. या नव्या आकडेवारीमुळे कोरोनाची बाधा झालेल्या जिल्हाभरातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६ हजार १२ वर पोहोचली असून कोरोनातून बरे होऊन सुटी घेतलेल्यांची संख्या १ लाख ४ हजार ३६२ झाली आहे. यामध्ये आज सुटी घेऊन घरी गेलेल्या दोन रुग्णांचाही समावेश आहे.

सध्या राज्याच्या काही भागात नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला असून त्याने अनेकांना कवेत घेतले आहे. मात्र असे असले तरी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट अमरावती जिल्ह्यात अद्याप आढळून आला नाही. दुसरीकडे या आजाराने आतापर्यंत १ हजार ५९३ नागरिकांचा बळी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...