आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाचे भाव पुन्हा घसरले!:प्रतिक्विंटल 7 हजार 900 रुपयांवर, सरकीच्या दरात घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटल्याने फटका

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी कापसाचे पेरणी क्षेत्र वाढले मात्र कापूस निघाल्यापासून कापसाला बाजारात प्रतिक्वंटल 8 हजार 200 ते 8 हजार 500 हाच दर मिळत होता. मागील महिनाभरापासून स्थानिक बाजारात कापसाचा हाच दर कायम होता. कापसाचे भाव वाढणार, या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा झटका बसला असून भाव वाढण्याऐवजी कमी झाले आहेत. आज (दि. 6) बाजारात कापसाचे दर प्रतिक्वंटल 7 हजार 800 ते 7 हजार 900 रुपयापर्यंत घसरले आहे.

मागील वर्षी कापसाला विक्रमी दर मिळाले होते. ईतिहासात कधी नव्हते तो कापूस प्रतिक्विंटल 14 हजारांपर्यंत पोहचला होता. यातही 12 हजार रुपये दर सुमारे महिना ते दिड महिना स्थिर होता. त्यामुळे स्वाभाविकच यंदा जिल्ह्यात कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली होती. दरम्यान दिड महिन्यापुर्वीच कापूस निघाला. मात्र बाजारात कापसाला असलेला दर लक्षात घेता शेतकऱ्यांचा पुर्णत: हिरमोड झाला. कारण मागील वर्षी 14 हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला काूपस यंदा 8 हजार 500 रुपयांवरच होता. दरम्यान भावात वाढ होईल, या अपेक्षेने गरज वगळता शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही.

दरम्यान आता एक महिना स्थिर असलेला कापसाचा दर क्विंटलमागे सुमारे 300 ते 400 रुपयांनी कमी झाला आहे. कापसाचा दर कमी होण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली तसेच सरकीच्या दरात आलेली घट हे कारणं असल्याचे कापूस व्यावसायिक सौरभ दिवान यांनी सांगितले आहे. बाजारातील स्थिती लक्षात घेता आगामी एक ते दोन महिने कापसाची भाववाढ होण्याची शक्यता नसल्याचेही कापूस बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

बाजारात आवक अल्प

मागील महीनाभर खासगी बाजारात 8 हजार 200 ते 8 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल दर कापसाला मिळत होता. मात्र, त्यामध्ये 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल घट झाली आहे. आगामी काही दिवस भाववाढीची शक्यता नाही. सद्या बाजारात दरदिवशी 700 ते 800 क्विंटल कापसाची आवक आहे. - राजू पमनानी, कापूस खरेदीदार.

बातम्या आणखी आहेत...