आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामित्व योजना:गावठाणातील जमिनीची आता होणार ड्रोनद्वारे मोजणी ; पी. आर. कार्ड देण्याचा शासनाचा उपक्रम

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामित्व योजनेंतर्गत अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्ह्यात ११ तालुक्यातील गावठाणातील मिळकतधारकांच्या मिळकतीचे मोजमाप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे अचूक व जलदगतीने सर्व्हेक्षण होत आहे. यामुळे मिळकतधारकांना अद्यावत नकाशे, पीआर कार्ड मिळणार आहे. तसेच शासनाच्या मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होणार आहे. याशिवाय नागरिकांच्या नागरी हक्काचे संर्वधनही होणार आहे.

ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे गावातील घरे, रस्ते, शासनाच्या ग्रामपंचायतींच्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील व मिळकतींचा नकाशा तयार होईल. याशिवाय कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका स्वरुपात तयार होणार आहे. त्यामुळे नागरिकांनाही विविध फायदे मिळणार आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्याने त्यावर कर्ज घेणे सुलभ होणार आहे. गावठाण भूमापनाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येत असल्याने गावकऱ्यांना त्यांचे अधिकार अभिलेख कार्यालयाकडून सुलभपणे उपलब्ध होतील. जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये मोजणी आटोपली आहे.

यामध्ये अमरावती, तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व दर्यापूर या तालुक्यातील गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे पूर्ण करण्यात आलेली आहे. याठिकाणी मिळकतीच्या चौकशीचे काम सध्या सुरु आहे. तसेच चिखलदरा, धारणी व चांदूर बाजार या तालुक्यांमध्ये अद्याप ड्रोन फ्लाय व्हायचा आहे. चांदूर बाजार येथे ई- निविदेची प्रक्रिया आटोपल्याने पुढील महिन्यात काम सुरु होणार आहे.

प्रत्येकाला त्यांच्या जागेची मापे समजतील स्वामित्व योजनेमुळे गावातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचा पुरावा, सनद व नकाशा मिळेल. त्यामुळे जागे संबंधित एकमेकांचे वाद निकाली निघेल. प्रत्येकाला त्यांच्या जागेची मापे समजतील. -स्मिता शाह, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, अमरावती

१० ते १५ मिनिटांत मोजणी : ड्रोनद्वारे मोजणीत प्रत्येक गावठाणातील मालमत्तांची मोजणी अवध्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होत आहे. या मोजणीमध्ये गावठाणातील गावांची हद्द, मालमत्तांचे क्षेत्र, मालकी रस्ते आदी माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच गावठाणाची मोजणी पूर्ण झाल्यावर गावातील प्रत्येक मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीचा अद्यावत नकाशा आणि पी.आर. कार्ड मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...