आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती हादरली!:दिवसभरात अमरावतीत आढळले कोरोनाचे 802 नवे रुग्ण; 10 रुग्णांचा मृत्यू, मागील 28 दिवसांत 9 हजार 650 कोरोना पॉझिटिव्ह

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांचा वयोगट ५६ ते ८५ वर्षे, चार महिन्यांतील दैनंदिन मृत्यूसंख्येचा उच्चांक

मनपा क्षेत्रात दक्षता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आजवर २१ लाख ५० हजार रु.चा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष बाब अशी की, लॉकडाऊन सुरू असतानाही आज (दि.२४) मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे तसेच रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना २९ हजार ५०० रु. दंड ठोठावण्यात आला. कोविड १९ रुग्णांची संख्या सुसाट वाढत असून, मनपा क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रभावीपणे तसेच मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्याद्वारे देण्यात आले होते. त्यानुसार सहायक आयुक्त, वैद्यकीय (स्वच्छता) अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शहरात मागील काही िदवसांपासून धडक कारवाई सुरू आहे. बुधवारी झोन क्र. १ मध्ये १४ हजार, झोन क्र. ५ मध्ये १५ हजार ५०० रु. दंड ठोठावण्यात आला.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर ५०० रुपये दंड आकारला जात आहे. शहरासह जिल्ह्यात नागरिकांनी फेस मास्क वापरावा यासाठी सातत्याने जनजागृती सुरू असून, त्यामुळे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क लावून वावरताना िदसत आहेत.

नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल
जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पेट्रोल- डिझेल पंपचालकांच्या संघटनेची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मास्क नसलेल्या व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पेट्रोल व डिझेल न देण्याचा निर्धार पेट्रोलपंप संचालकांनी व्यक्त केला, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र मेहता, सचिव सौरभ जगताप यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना मृत्यूचा दुसरा उच्चांक

कोरोना सुरु झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या दररोजच्या मृतांमध्ये बुधवारची १० ही संख्या उच्चांकाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी एकाच दिवशी डझनभर मृत्यूंची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोना ऐन भरात असताना ती पहायला मिळाली होती. त्यानंतर सोमवारी एकाच दिवशी नोंदले गेलेले सहा मृत्यू हे दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु आजच्या संख्येने तोही रेकॉर्ड मोडला आहे.

अमरावती जिल्ह्यात मागील २८ दिवसांत ९ हजार ६५० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
जिल्ह्यात मागील २८ िदवसांत ९ हजार ६५० कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची भर पडली. एवढ्या वेगाने कोरोना संसर्ग वाढला. ५ फेब्रुवारीला २३३ पर्यंत आकडा वाढला होता. त्यानंतर ६ फेब्रुवारीला १९९ रुग्णांची त्यात भर पडली. ७ रोजी १९२ रुग्ण होते. १० फेब्रुवारीला ३५९ पर्यंत कोरोना बाधितांची संख्या वाढली. यानंतरच जिल्हा प्रशासन सतर्क झाले. १४ फेब्रुवारीला ३९९, १५ फेब्रुवारीला ४४९, १६ फेब्रुवारीला ४८५, १७ रोजी ४९८, १८ रोजी ५९७, १९ रोजी ५९८, २० रोजी अचानक ७२७ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर प्रशासनाने लाॅकडाऊन घोषित केले. २१ राेजी ७०९, २२ रोजी ६७३, २३ रोजी कोरोनाचा विस्फोट झाला. एकाच िदवशी सर्वाधिक ९२६ रुग्णांची नोंद झाली. तर २४ रोजी ८०२ कोरोना बाधित आढळले. हे आकडे बघून जिल्हावासी चांगलेच हादरले आहेत. शहरात ७ िदवसांच्या लाॅकडाऊनचा बुधवारी दुसरा िदवस होता. मात्र रस्त्यावर चांगलीच गर्दी िदसून आली. एका िदवसांत ८०० च्या वर पाॅझिटिव्ह रुग्ण िमळत असतानाही नागरिक मात्र अजुनही बाहेर फिरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...