आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकपचा झेंडा:नेरपिंगळाई विविध कार्यकारी संस्था निवडणुकीत भाकपचा झेंडा

नेरपिंगळाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बहुचर्चित व प्रतिष्ठित असणाऱ्या नेरपिंगळाई विविध कार्यकारी संस्था निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विजयाची परंपरा कायम राखत पुन्हा एकतर्फी विजय मिळविला आहे.भाजप, काँग्रेस युतीच्या युवा शेतकरी गटाच्या उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

भाकप समर्थित उमेदवार महिला राखीव मतदार संघातून अर्चना कुऱ्हाडे यांना ७६६ मते मिळालीत. याशिवाय दमयंती बोबडे (७०१), अनुसूचित जाती मतदार संघातून नीलेश तायडे (७२८), इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून राहुल मंगळे (७१६), विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून अरुण दाभेकर (७३०), कर्जदार मतदार संघातून कृष्णराव अमृते (६५९), राजेंद्र घाटगे (६७७), प्रभाकर टाकळे (६६०), विजय नालट (६६३), संजय मंगळे (६६८), वैभव राऊत (६७४), शेख अय्याज (६३७), तर संजय सुने यांना ६७३ मते प्राप्त झाली. या निवडणुकीत राजेश भुयार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.

बातम्या आणखी आहेत...