आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेट सट्टा प्रकरणातील बुकी अनिल ऊर्फ काॅस्को मेटकर याला शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतील ठाणे भागात पकडून अटक केली आहे. २५ नोव्हेंबरला शहरातील राजापेठ भागात पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने एक क्रिकेट सट्टा पकडला होता. त्याच गुन्ह्यात कॉस्कोचे नाव समोर आले होते. त्यावेळपासून शहर पोलिस त्याच्या मागावर होते, अखेर त्याला मुंबईतून पकडण्यात गुरुवारी (दि. ८) पोलिसांना यश आले आहे.
भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०२२ लगा सचिन वासुदेव येरोणे (३७, रा. सातुर्णा) याला रंगेहाथ पकडले होते. त्याचवेळी पोलिसांनी सचिनकडून २ मोबाइलसह क्रिकेट सट्टा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.