आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकीनंतर कारवाई:‘मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर संपवून टाकू’; मंत्री आव्हाड यांना धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

अमरावती3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी गुरुवारी रात्रीच त्या युवकाला अटक करून समजपत्रावर सोडले आहे

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सोशल मीडियावरून अमरावतीमधील ३१ वर्षीय युवकाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुरुवारी आव्हाड यांच्या स्वीय सहायकांनी बडनेरा पोलिसांकडे ई-मेलवरून तक्रार केली. पोलिसांनी गुरुवारी रात्रीच त्या युवकाला अटक करून समजपत्रावर सोडले आहे. 

सूरज रमेशराव वडगावकर असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना फेसबुकवरून ‘जितेंद्र आव्हाड यांचा दाभोलकर होणार, मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर संपवून टाकू’ अशी धमकी दिली होती. ही पोस्ट आव्हाड यांना दिसल्यानंतर त्यांनी पोस्ट टाकणाऱ्याची माहिती काढली. त्यांचे स्वीय सहायक शंभूराजे ढवळे (सोलापूर) यांनी शहर पोलिसांसोबत संपर्क केला. तसेच त्यांनी ई-तक्रार पाठवली. या तक्रारीवरून पोलिसांनी सूरजविरुद्ध जिवेे मारण्याची धमकी देण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...