आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे

वर्धाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करत ट्रॅक्टर ट्रॉलीसह ७ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

देवळी पोलिस ठाण्यातील सुभाष आदे यांना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता नितेश अशोक बावनकर, सतीश महादेव पारिसे दोघेही रा. मिरननाथ देवळी, धनराज चरणदास निंबोरे रा. इंदिरानगर देवळी व महेश उर्फ गजानन मनोहर भानारकर रा. वॉर्ड न. १७ देवळी हे चौघे नदीतून ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करत ट्रॅक्टर ट्रॉलीसह ७ लाख १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई देवळी पोलिसांनी केली.

बातम्या आणखी आहेत...